धारधार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या १९ वर्षीय युवकावर गुन्हा
पिंपरी, ता. २९ - धारधार लोखंडी तलवार सोबत बाळगणाऱ्या १९ वर्षीय युवकाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मंगळवारी (ता. २८) मोशीगावातून ताब्यात घेतले आहे.
ऋषिकेश पांडुरंग वानखेडे ( वय १९ वर्षे रा. मोशी) हा आरोपी आहे. त्याने शस्त्रबंदी आदेशाचा भंग करुन लोखंडी तलवार बाळगली होती. ही तलवार त्याने शर्टच्या आत लपवली होती. तो पोलिसांना मोशी गावच्या हद्दीत सापडला.
आरोपीविरोधात एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४९ चे कलम ३७ (१) (३), १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.