काळेवाडीतील एम. एम. विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत प्रथम क्रमांक
Apr 25 2026
56
काळेवाडीतील एम. एम. विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत प्रथम क्रमांक
पिंपरी, ता. २५ - मराठवाडा मित्र मंडळाच्या एम. एम. विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५-२६ अंतर्गत प्रथम क्रमांक मिळाला. पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुणवत्ता संवर्धन अभियान २०२६-२७’चा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
स्पर्धेत विद्यालयाने शहर व तालुका स्तरावरील गट आठवी ते बारावी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. हा पुरस्कार शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग डॉ. भाऊसाहेब कारेकर, प्रा. नंदकुमार सागर आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभावती जट्टे व पर्यवेक्षक विजयकुमार सोळुंके यांनी शाळेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
- पुरस्कार वितरण समारंभ, Award Ceremony, प्रथम क्रमांक, First Rank, शाळा यश, School Achievement,
- , पुणे जिल्हा परिषद, Pune Zilla Parishad, माध्यमिक शिक्षण विभाग, Secondary Education Department,
- गुणवत्ता संवर्धन अभियान, Quality Enhancement Campaign
- मराठवाडा मित्र मंडळ, Marathwada Mitra Mandal,
- एम.एम. विद्यामंदिर, MM Vidyamandir, काळेवाडी, Kalewadi