news
clock
पिंपरीतील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला गुणवत्ता संवर्धन अभियानात प्रथम क्रमांक

पिंपरीतील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला गुणवत्ता संवर्धन अभियानात प्रथम क्रमांक

 पिंपरीतील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला गुणवत्ता संवर्धन अभियानात प्रथम क्रमांक

पिंपरी, ता. २७ -  भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने गुणवत्ता संवर्धन अभियानात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग तसेच पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने हे अभियान  राबविण्यात आले. 

या गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत जिल्ह्यातील सुमारे १६७० विद्यालयांची तपासणी करण्यात आली. प्रशासकीय, आर्थिक, क्रीडा, कला, विज्ञान तसेच शैक्षणिक गुणवत्ता अशा विविध निकषांवर  पडताळणी करण्यात आली. या सर्वांगीण मूल्यांकनात शहरी गटातून पिंपरी विभागातील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला. 

बक्षीस समारंभाला संस्थेचे प्रबंध समिती सदस्य व प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके, प्राचार्य दिलीपकुमार देशमुख, उपप्राचार्य अविनाश यादवाडकर, पर्यवेक्षक गजानन वाढे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जाधव तसेच वाघोली विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी उपस्थित होते. शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर तसेच मुख्याध्यापक संघ राज्य महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांच्या हस्ते विद्यालयाने पारितोषिक स्वीकारले.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories