अल्पवयीन गुन्हेगाराने ५१ वर्षीय इसमाला चाकूने भोसकले, मोरवाडी-पिंपरीतील घटना
Jun 12 2026
47
अल्पवयीन गुन्हेगाराने ५१ वर्षीय इसमाला चाकूने भोसकले, मोरवाडी-पिंपरीतील घटना
पिंपरी, ता. १२ - किरकोळ कारणावरुन एका अल्पवयीन गुन्हेगाराने ५१ वर्षीय इसमाला चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना मोरवाडी-पिंपरी येथील रेणुका गुलमोहर इमारतीत १० जूनला रात्री आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी अल्पवयीन गुन्हेगारासोबत असणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत, जखमी झालेले संतोष यशवंत कदम (वय ५१ वर्षे) यांच्या पत्नीने तक्रार दिली आहे. १० जूनला कदम व त्यांची पत्नी सोसायटीत लिफ्टमध्ये 'चप्पल बूट स्टॅण्डवर थुंकल्याच्या' विषयावर एकमेकांशी बोलत होते. तेव्हा अल्पवयीन गुन्हेगाराने त्या दांपत्याला शिवीगाळ केली. लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर अल्पवयीन गुन्हेगाराने कदम यांना "मी तुला आता जिवंत सोडणार नाही, तू कसा जिवंत राहतो ते बघतो मी" अशी धमकी दिली. यावेळी तो गुन्हेगार व दांपत्य यांच्यात धक्काबुक्की झाली.
फिर्यादी दांपत्य तक्रार देण्यासाठी निघाले असता अल्पवयीन गुन्हेगार व कविता उभयकर ही महिला अचानक त्यांच्या घरातून बाहेर येऊन फिर्यादी दांपत्याच्या अंगावर धावून गेले. कविता हीने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन गुन्हेगाराने हातातील चाकूने संतोष कदम यांच्या पाठीवर व डोक्यावर चार पाच वार केले. "तुला आता मी जिवंत सोडणार नाही तुझा मर्डर करतो" असे म्हणत त्याने कदम यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने भोसकले. यात कदम गंभीर जखमी झाले. अल्पवयीन गुन्हेगार व कविता उभयकर ही महिला तेथून पळून गेले.
या घटनेत दोन्ही आरोपींवर संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११५, ३५२, ३(५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चेकलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता योगेश उभयकर हीला अटक झाली आहे.
- संत तुकारामनगर पोलीस प्रकरण, IPC Sections 109 115 352, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, Maharashtra Police Act 1951, Criminal case
- Kavita Ubhaykar arrested, Sant Tukaram Nagar police case
- ५१ वर्षीय इसमाला चाकूने भोसकले, 51-year-old man stabbed, संतोष कदम जखमी, Santosh Kadam injured, कविता उभयकर अटक
- , Morwadi Pimpri minor accused stabbing
- मोरवाडी पिंपरी अल्पवयीन गुन्हेगार चाकू हल्ला