news
clock
दहावी-बारावीच्या परीक्षेच्या शुल्कात वाढ, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय

दहावी-बारावीच्या परीक्षेच्या शुल्कात वाढ, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय

दहावी-बारावीच्या परीक्षेच्या शुल्कात वाढ, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय

पुणे, ता. ६ -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेच्या शुल्कात वाढ केली आहे. ही शुल्क वाढ जून - जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेपासून लागू करण्यात आली आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी परीक्षा शुल्क वाढीबाबतचे परिपत्रक काढले आहे.  

राज्य सरकारचा आदेश आणि कार्यकारी परिषदेच्या सभेतील निर्णयास अनुसरून जून-जुलैमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेपासून परीक्षा शुल्क सुधारित केले  असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. त्यानुसार, दहावीचे नियमित विद्यार्थी, तंत्रविषय विद्यार्थी, खासगी विद्यार्थी यांच्यासाठी निश्चित केलेल्या शुल्कात परीक्षा शुल्क ५७० रुपये, प्रशासकीय शुल्क २० रुपये, गुणपत्रिका शुल्क २० रुपये, प्रमाणपत्र शुल्क २० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (शास्त्र विषय) १० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (तंत्र प्रती विषय) १०० रुपये, खासगी विद्यार्थी नोंदणी शुल्क १११० रुपये, खासगी विद्यार्थी प्रक्रिया शुल्क १०० रुपये आहे. 

पुनर्परीक्षार्थी आणि तुरळक विषय विद्यार्थ्यांसाठी शुल्कात परीक्षा शुल्क ५७० रुपये, प्रशासकीय शुल्क २० रुपये, गुणपत्रिका शुल्क २० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (शास्त्र विषय) १० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (तंत्र प्रती विषय) १०० रुपये, तर श्रेणीसुधार परीक्षेसाठी नियमित किंवा खासगी विद्यार्थी ११३० रुपये, प्रशासकीय शुल्क २० रुपये, गुणपत्रिका शुल्क २० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (शास्त्र विषय) १० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (तंत्र प्रती विषय) १०० रुपये निश्चित केले आहे.

बारावीचे नियमित, खासगी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क ५९० रुपये, प्रशासकीय शुल्क २० रुपये, गुणपत्रिका शुल्क २० रुपये, प्रमाणपत्र शुल्क २० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय) १५ रुपये, एमसीव्हीसी प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय) ३० रुपये, माहिती तंत्रज्ञान विषय शुल्क २०० रुपये, खासगी विद्यार्थी नोंदणी शुल्क १११० रुपये, खासगी विद्यार्थी प्रक्रिया शुल्क १०० रुपये, पुनर्परीक्षार्थी आणि तुरळक विषयांसाठी परीक्षा शुल्क ५९० रुपये, प्रशासकीय शुल्क २० रुपये, गुणपत्रिका शुल्क २० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय) १५ रुपये, एमसीव्हीसी प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय) ३० रुपये, माहिती तंत्रज्ञान विषय शुल्क (प्रती विषय) २०० रुपये आहे. 

श्रेणीसुधार परीक्षेसाठी नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षा शुल्क ११८० रुपये, प्रशासकीय शुल्क २० रुपये, गुणपत्रिका शुल्क २० रुपये, एमसीव्हीसी प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय) ३० रुपये, माहिती तंत्रज्ञान विषय शुल्क (प्रती विषय) २९९ रुपये असे शुल्क निश्चित केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories