मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी
May 05 2026
24
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी
पिंपरी, ता. ५ - मुंबई–पुणे एक्सप्रेसवे'वर कारने ट्रेलरला जोरदार धडक दिली. या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आणि चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी (ता. ४) पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास ओझर्डे गावच्या हद्दीत घडला आहे. आरोपी कारचालक २१ वर्षाचा आहे. त्याच्यावर शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, ट्रेलरचालक प्रविण धन्ना सिंग (वय २८ वर्षे, रा. राजस्थान) याने तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी कारचालक प्रतिक सरवदे (वय २१ वर्षे, रा. भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रविण सिंग हे ट्रेलर चालवत मुंबईहून पुण्याकडे जात होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या इर्टिगा कारचालकाने ट्रेलरला जोरदार धडक दिली. हा कारचालक निष्काळजीपणे वाहन चालवत होता.
या अपघातात सुनीता नारायण भट (वय ५५ वर्षे, रा. मुंबई) यांचा गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला आणि सौदागर देवीदास गायकवाड (वय ४२वर्षे), बिपीन प्रजापती (वय २७ वर्षे, रा. म्हाळुंगे, पुणे) आणि एम. डी. नईम अकबर (वय ५३ वर्षे, रा. नालंदा, बिहार) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातात कार चालकही जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी कारचालकावर भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.