news
clock
''नराधम आरोपीला फाशी मिळेपर्यंत मी तुमच्या सोबत आहे.'', पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा चिमुकलीच्या पालकांना शब्द

पुणे, ता. ५ - नसरापूर येथील अत्याचाराच्या घटनेतील बालिकेच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (ता.४) सायंकाळी भेट देतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि ''नराधम आरोपीला फाशी मिळेपर्यंत मी तुमच्या सोबत आहे.'', असा शब्द दिला. 

 ''तुम्हाला कधीही माझ्याशी काही बोलायचे असेल तर मला सांगा मी तुमच्या घरी येईन.'', असे बालिकेच्या पालकांना सांगितले. ''तुमच्या मागण्या आम्ही नक्की पूर्ण करु, या प्रकरणासाठी लवकरच विशेष सरकारी वकील नियुक्त केला जाईल.'', असा शब्द पालकांना दिला. 

या घटनेमुळे संबंध महाराष्ट्र सुरक्षा व्यवस्थेवर संतापला आहे. आंदोलने होत आहेत. आरोपीला तत्काळ मारुन टाकण्याची एकच मागणी जनता करत आहे. अत्याचाराला बळी पडलेल्या चिमुकलीचे पालक उद्गविग्न मनस्थितीत आहेत, आरोपीला फाशी होईपर्यंत कोणीही राजकारण्यांनी आमच्या घरी सांत्वनासाठी येऊ नये, असे चिमुकलीच्या वडीलांनी सांगितले आहे. म्हणून,  पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः भेट घेऊन चिमुकलीच्या पालकांना आधार, बळ दिले. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories