लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ, मुंबई’पत्रकार संघटनेची स्थापना

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ, मुंबई’पत्रकार संघटनेची स्थापना

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ, मुंबई’पत्रकार संघटनेची स्थापना

पिंपरी, ता. ४ - राज्यभरातील पत्रकारांना संघटित करुन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ, मुंबई’या  पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली. भोसरी येथील फर्न रेसिडेन्सीमध्ये हा स्थापना समारंभ झाला.

 खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महापौर रवी लांडगे, ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची समारंभाला प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी संघटनेला शुभेच्छा दिल्या.  वेळी उपस्थित होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद घोळवे यांनी संघटेनेचा उद्देश सांगितला.  या कार्यक्रमात ‘महाराष्ट्रधर्म आणि पत्रकारिता’ या विषयावर झालेल्या विशेष परिसंवादात पद्मश्री गिरीष प्रभुणे,  ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक गुणवंत पाटील,  News18 या वृत्तवाहिनीचे संपादक मंदार फणसे, दैनिक लोकमत संपादक संजय आवटे, महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक महेश म्हात्रे, मुक्तपीठचे संपादक  तुळशीदास भोईटे,  ज्येष्ठ विचारवंत संजय सोनवणी सहभागी झाले होते. 

खासदार बारणे, आमदार जगताप, महापौर लांडगे यांनी संघटनेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला  उद्योजक संतोषशेठ बारणे, पत्रकार गोविंद वाकडे, अश्विनी सातव-डोके, नाना कांबळे, नितीन शिंदे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते सागर पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद प्रभू, ‘बेळगाव लाईव्ह’चे संपादक प्रकाश बेळगोजी उपस्थित होते. पत्रकारांनी संयोजन केले. मराठी अस्मिता आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या पार्श्वभूमीवर उभी राहणारी ही नवी संघटना प्रामुख्याने सीमाभागातील अपूर्ण प्रश्नांना नवी दिशा देण्याचा संकल्प करत आहे. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची प्रेरणा घेत, पत्रकारितेच्या माध्यमातून हा लढा अधिक प्रभावीपणे पुढे नेला जाईल असा संकल्प पत्रकारांनी केला आहे. 

नव्या संघटनेची उद्दिष्टे -

- सीमाभागातील लढ्याला दिशा: स्थानिक प्रश्नांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणे

- पत्रकारांचे संरक्षण -  हल्ले, अन्याय आणि व्यावसायिक समस्यांविरोधात भक्कम भूमिका

- सामाजिक बांधिलकी: पाणी, पायाभूत सुविधा आणि प्रशासनाशी संबंधित प्रश्नांवर आवाज

- नव्या पिढीला मार्गदर्शन: डिजिटल युगात मूल्याधारित पत्रकारिता रुजवणे

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories