नसरापूर घटनेतील आरोपीचे वकिलपत्र कोणीही स्विकारु नये, पुणे बार असोसिएशनचे वकिलांना आवाहन
May 06 2026
58
नसरापूर घटनेतील आरोपीचे वकिलपत्र कोणीही स्विकारु नये, पुणे बार असोसिएशनचे वकिलांना आवाहन
पुणे, ता. ६ - नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणाचा पुणे बार असोसिएशनने तीव्र निषेध केला आहे. आरोपीचे वकीलपत्र कोणीही स्विकारु नये, असे आवाहन असोसिएशनकडून सर्व वकिलांना करण्यात आले आहे.
नसरापूरातील घटनेने संपूर्ण राज्यभरात संताप उफाळून आला आहे. पुणे बार असोसिएशननेही आरोपीच्या विरोधात लढा देण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच पुणे बार असोसिएशनच्या कार्यकारिणीने याबाबत सदस्य वकिलांना संदेश पाठवून वकीलपत्र न स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. ही घटना अतिशय वाईट, क्रूर असून एका बालिकेने यात जीव गमावला आहे.
आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. आरोपीच्या विरोधातील एक लढा म्हणून आम्ही सदस्यांना आरोपीचे वकीलपत्र न स्वीकारण्याची विनंती केली आहे, अशी माहिती, असोसिएशनने दिली आहे.