नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ लोकहितवादी सेवा संघाचे आंदोलन
May 05 2026
17
नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ लोकहितवादी सेवा संघाचे आंदोलन
पिंपरी, ता. ५ - नसरापूर येथे घडलेल्या बालिकेवरील अत्याचाराच्या अमानुष व संतापजनक घटनेचा लोकहितवादी सेवा संघाने आंदोलन करुन निषेध केला. आंदोलकांनी हातात फलक घेऊन “चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे”,“दोषींना फाशी झालीच पाहिजे ” अशा घोषणा दिल्या. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात भव्य आंदोलन पार पडले.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात झालेल्या या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे. गुन्हेगारांना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.” अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व लोकहितवादी सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष धर्मराज बनसोडे यांनी केले. बनसोडे, महाराष्ट्र राज्य सचिव विशालभाई वाघमारे तसेच लोकहितवादी सेवा संघाचे पदाधिकारी अजिंक्यभाऊ वाघमारे, ऋषिकेश वाघमारे, निलेश कांबळे, मनोज पवार, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शेलार, सोमनाथ कलाटे, प्रफुल्ला मोतलिंग, किशोर काळसकर यांनी भावना व्यक्त करत आरोपीवर तत्काळ कारवाईची मागणी केली.
आंदोलनात अनिल गाडे, अनिल मुळवाड , प्रथमेश सावंत, निलेश कदम, अमोल भालेराव, राजू वाडेकर, अनिता राठोड, शशिकांत गुप्ता, अक्षय पवार, राशीद सय्यद, सरफाराज खान, मिरज अन्सारी, मयूर कुंभार, अभिषेक काळे, दत्ता भोई, अतिश दुधावडे आदी लोकहीतवादी सेवा संघांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले.
- , justice for victim, demand for strict action
- Nasrapur incident, Pimpri protest, Lokhitwadi Seva Sangh
- , protest against crime, minor girl assault case,
- बाल सुरक्षा मुद्दा, संतापजनक घटना, कठोर कारवाई मागणी
- न्यायाची मागणी, दोषींना शिक्षा
- लोकहितवादी सेवा संघ, पिंपरी आंदोलन,
- नसरापूर अत्याचार प्रकरण, बालिकेवरील अत्याचार, निषेध आंदोलन