news
clock
पिंपरी-चिंचवड  राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाच्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी प्रवीण पिंजण यांची नियुक्ती

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाच्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी प्रवीण पिंजण यांची नियुक्ती

पिंपरी-चिंचवड  राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाच्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी प्रवीण पिंजण यांची नियुक्ती

पिंपरी, ता. २  - 'राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल, पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा)' च्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी प्रवीण पिंजण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे यांनी नियुक्तीपत्र देत ही घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, राष्ट्रवादी सेवादलचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, फजल शेख, सतीश दरेकर आदी उपस्थित होते.

प्रवीण पिंजण यांच्या नियुक्तीमुळे भोसरी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच पक्षाचे विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रवीण पिंजण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रात नमूद केल्यानुसार, स्व.अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम प्रभावीपणे करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रवीण पिंजण यांच्या नियुक्तीबद्दल कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळात भोसरी विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिक सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories