news
clock
वैभवशाली राष्ट्रनिर्माणासाठी  'राष्ट्र प्रथम' हा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवणे आवश्यक -  ज्येष्ठ विचारवंत प्रफुल्ल केतकर    चिंचवडमध्ये संघ शताब्दी मंथन कार्यक्रम

वैभवशाली राष्ट्रनिर्माणासाठी 'राष्ट्र प्रथम' हा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवणे आवश्यक - ज्येष्ठ विचारवंत प्रफुल्ल केतकर चिंचवडमध्ये संघ शताब्दी मंथन कार्यक्रम

 वैभवशाली राष्ट्रनिर्माणासाठी  'राष्ट्र प्रथम' हा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवणे आवश्यक -  ज्येष्ठ विचारवंत प्रफुल्ल केतकर 

 चिंचवडमध्ये संघ शताब्दी मंथन कार्यक्रम 

पिंपरी, ता. २  - ''वैभवशाली राष्ट्रनिर्माणासाठी समाजातील सज्जनशक्तीचे संघटन करणे व पंथ, जाती, प्रांत, भाषा या पलीकडे जाऊन 'राष्ट्र प्रथम' हा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवणे आवश्यक आहे.'', असे मत ज्येष्ठ विचारवंत, साप्ताहिक 'ऑर्गनायझर'चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  पिंपरी चिंचवड विभागाच्या वतीने २९ एप्रिलला चिंचवड येथे आयोजित संघ शताब्दी मंथन या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, पुणे विभाग प्रचार प्रमुख पंकज जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 केतकर म्हणाले, '''राष्ट्र प्रथम' हा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या १०० वर्षांपासून करत आहे. संघाची स्थापना हा  विखुरलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्याचा प्रयोग होता. त्या काळात संघर्ष होता, गैरसमज होते, विरोध होता; पण प्रत्येक अडचणीतून संघ अधिक सक्षम होत गेला. 

वैभवशाली भारत ही केवळ राजकीय संकल्पना नाही, तर सांस्कृतिक,सामाजिक आणि मानसिक स्वावलंबनाची प्रक्रिया आहे. लोकशाही टिकवायची असेल, तर संघर्ष नव्हे तर संवाद आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाची विचारधारा वेगळी असली तरी ती विचारधारा राष्ट्रहिताच्या धाग्यात जोडली गेला पाहिजे. देशासाठी काम करणारा प्रत्येक जण, कोणत्याही विचारसरणीचा असो, तो राष्ट्रनिर्मितीचाच भाग आहे, ही व्यापक भूमिका संघात मांडली जाते. भारताला सामर्थ्यशाली बनवण्याच्या या प्रवासात प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे.''

पंकज जयस्वाल यांनी पंचपरिवर्तन - कुटुंब प्रबोधन, नागरी कर्तव्ये, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्व बोध विषयावर मांडणी केली. कार्यक्रमात सुरुवातीला अनिरुद्ध सराफ व अनिकेत यांचे बासरीवादन व त्यानंतर भारतमाता पूजन झाले. प्रास्ताविक  सारंग पापळकर यांनी केले. सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले. वैभव वाघोलीकर यांनी आभार मानले.  प्रज्ञा फुलपगार यांनी वंदे मातरम् सादर केले. राम गहलोत यांनी पंच परिवर्तन या विषयावर भव्य रांगोळी काढली होती.कार्यक्रमाला शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories