स्वतःच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा, डॉ. नीलम गोऱ्हे यांचे  मुख्यमंत्र्यांना निवेदन

स्वतःच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा, डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

 स्वतःच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा, डॉ. नीलम गोऱ्हे यांचे  मुख्यमंत्र्यांना निवेदन 

पुणे, ता. ७ - साठ वर्षीय आजोबाने स्वतःच्या नऊ वर्षीय नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची निंदनीय घटना मंगळवारी (ता. ५) पर्वती परिसरात घडली. घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 या प्रकरणाचा जलदगतीने तपास करुन दोषारोपपत्र दाखल करावे. आरोपीला जामीन मिळू नये यासाठी सरकारी पक्षाने न्यायालयात भक्कम बाजू मांडावी. बालिकेला 'मनोधैर्य' योजनेचा लाभ द्यावा. वस्ती पातळीवर लोकांच्या सहभागातून 'महिला सुरक्षा समिती' स्थापन करावी, डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.  

या घटनेतील आरोपीला बुधवारी (ता. ६) संध्याकाळी विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी केला. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांनी गुन्ह्याच्या तपासाची माहिती न्यायालयास दिली. आरोपीच्यावतीने विधी सेवा प्राधिकरणाचे वकील अॅड. ए. ए. जीवने यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद घेत न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories