चिखली | २२ ऑक्टोबर २०२६ : चिखलीतील संभाजीनगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ४२ वर्षीय शेतकऱ्याच्या डोक्यावर आणि डाव्या खांद्यावर सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने मारहाण केल्याची घटना घडली आहे. आरोपीने शिवीगाळ व धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजता रोटरी क्लब कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर कमानीजवळ, संभाजीनगर, चिखली, पुणे येथे घडली.
या प्रकरणी संदीप लक्ष्मण भुजबळ (वय ४२ वर्षे, व्यवसाय शेती, रा. समृद्धी पार्क, प्लॉट क्रमांक ५०, सेक्टर क्रमांक १९, के. जी. चावला हायस्कूलजवळ, न्यू शरद नगर, स्पाईन रोड, चिखली, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपीचे नाव प्रवीण देविदास पारखे (वय ३८ वर्षे, रा. जिजामाता हौसिंग सोसायटी, लेन क्रमांक ८, सेक्टर क्रमांक १९, के. जी. चावला हायस्कूलजवळ, न्यू शरद नगर, स्पाईन रोड, चिखली, पुणे) असे आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, घटनेच्या वेळी प्रवीण पारखे याने फिर्यादी संदीप भुजबळ आणि त्यांचा मित्र सचिन ढगे यांच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद घातला. त्यानंतर त्याने संदीप भुजबळ यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
आरोपीने संदीप भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला पडलेला सिमेंटचा पेव्हर ब्लॉक उचलून त्यांच्या डोक्यावर आणि डाव्या खांद्यावर प्रहार केला. या हल्ल्यात संदीप भुजबळ जखमी झाले. आरोपीने त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९(१), ३५२ आणि ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.