हिंजवडीत गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून; पती पोलिसांच्या ताब्यात

हिंजवडीत गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून; पती पोलिसांच्या ताब्यात

हिंजवडी | २२ ऑक्टोबर २०२६ : हिंजवडीतील कस्तुरी चौकाजवळील बांधकाम मजूर कॅम्पमध्ये २३ वर्षीय गर्भवती महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते २२ ऑक्टोबर रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या दरम्यान सुखवाणी अंबर कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्प, कस्तुरी चौक, हिंजवडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथे घडली.

या प्रकरणी रुपेश शंभू साव (वय ३८ वर्षे, व्यवसाय मजुरी, सध्या राहणार सुखवाणी अंबर कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्प, हिंजवडी; मूळ राहणार ग्राम चैनपूर, जिल्हा कैमूर, बिहार) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपीचे नाव राकेश सागर गोंड (वय ३० वर्षे, राहणार सुखवाणी अंबर कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्प, कस्तुरी चौक, हिंजवडी) असे असून, तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, राकेश गोंडची पत्नी अनिता कुमारी गोंड (वय २३ वर्षे) घटनेच्या वेळी कापूरमध्ये लवंग टाकून त्याची वाफ घेत होती. त्यावेळी आरोपीने तिला अर्धनग्न अवस्थेत खोलीबाहेर ओढून आणले. त्यानंतर तिला मारहाण करून गळा दाबून जिवे ठार मारल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या घटनेप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याची नोंद २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.३१ वाजता करण्यात आली असून, पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories