निगडीत पत्यांचा जुगार खेळताना चौघांवर कारवाई; १,३१५ रुपये रोख जप्त

निगडीत पत्यांचा जुगार खेळताना चौघांवर कारवाई; १,३१५ रुपये रोख जप्त

निगडीत पत्यांचा जुगार खेळताना चौघांवर कारवाई; १,३१५ रुपये रोख जप्त

पिंपरी, ता. १० : निगडी ओटास्किम परिसरातील महात्मा फुले हौसिंग सोसायटीसमोरील पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या जागेत पत्यांचा जुगार खेळताना चौघांवर निगडी पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवारी (ता. १०) सायंकाळी सुमारे ५.४० वाजता करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी मछिंद्र लांडगे (वय ३६, रा. रुपीनगर, ओटास्किम निगडी), किशोर बाळासाहेब कांबळे (वय ३६, रा. महात्मा फुले हौसिंग सोसायटी), संतोष चांगदेव वाघमारे (वय ४०, रा. रुपीनगर परिसर) आणि बाळू नागोराव शिकरे (वय ४९, रा. महात्मा फुले हौसिंग सोसायटी, ओटास्किम) हे पत्यांचा जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून १,३१५ रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.

या प्रकरणी पोलिस शिपाई सचिन चंद्रकांत पवार यांनी फिर्याद दिली असून चौघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना बीएनएस कलम ३५(३) अंतर्गत नोटीस देण्यात आली असून पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories