सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर
Apr 25 2026
48
सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर
पुणे, ता. २५ - महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४, ७८ आणि ८५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याअंतर्गत सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान (वर्किंग नॉलेज) अनिवार्य करण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार मसुदा अधिसूचना काढण्याची प्रक्रिया सुरु आहे.
या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्थानिक भाषेला प्राधान्य मिळणार असून, प्रवाशांना अधिक सुलभ व स्नेही सेवा मिळेल, अशी अपेक्षा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.
प्रस्तावित तरतूदींनुसार, सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याची परवानगी देताना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान तपासले जाणार आहे, मीटर असलेल्या मोटार कॅब वाहनांसाठी परवान्यांच्या अतिरिक्त अटींमध्ये मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात येणार आहे, विशेषतः ऑटो रिक्षा व टॅक्सी (मोटार कॅब) चालकांच्या परवाना नूतनीकरणाच्या वेळी मराठीचे ज्ञान दाखवणे बंधनकारक असणार आहे. या तरतूदींवर नागरिक, संघटनांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचा शासनाकडून विचार करण्यात येणार आहे.
- Public Transport Driver, Marathi Language, Proposal, Home Department,
- Motor Vehicle Rules, Working Knowledge,
- मसुदा अधिसूचना, स्थानिक भाषा, प्रवाशी, सु
- परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक,
- सार्वजनिक सेवा वाहन, परवाना, टॅक्सी, ऑटो रिक्षा, परवाना नूतनीकरण
- प्रस्ताव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, मोटार वाहन नियम
- सार्वजनिक वाहतूक, वाहनचालक, मराठी, ज्ञान, अनिवार्य