आपत्कालीन सज्जतेसाठी हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत एनएसजी आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 'मॉक ड्रिल'

आपत्कालीन सज्जतेसाठी हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत एनएसजी आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 'मॉक ड्रिल'

आवश्यक सज्जतेसाठी हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत एनएसजी आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 'मॉक ड्रिल' 

पिंपरी, ता. ६ ऑगस्ट २०२६ - हिंजवडी फेज - २ येथे इन्फोसिस कंपनीत दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने एनएसजी आणि पिंपरी-चिंचवड पोलिस यांच्याकडून संयुक्तपणे बुधवारी (ता. ५) 'मॉक ड्रिल' राबवण्यात आली.

 भविष्यात एखाद्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला तातडीने प्रतिकार करण्यासाठी आवश्यक सज्जता, तसेच संबंधित यंत्रणांना दहशतवादी हल्ल्याच्या परिस्थितीत करावयाच्या कारवाईचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ही मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली होती. या मॉक ड्रिलमध्ये मुंबई एनएसजीच्या स्पेशल कंपोझिट  ग्रुपचे अधिकारी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सहभागी झाले होते. याशिवाय अमेरिकन सैन्यातील १७ कमांडो देखील यात सहभागी झाले होते. तसेच  एनएसजीचे अधिकारी आणि कमांडो, पिंपरी-चिंचवड पोलिसांची दहशतवाद विरोधी शाखा, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, हिंजवडी पोलिस, वाहतूक पोलिस तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. 

मॉक ड्रिलदरम्यान अचानक दहशतवादी हल्ला झाल्यास पोलिस आणि इतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी कशा पद्धतीने कारवाई करावी, परिसराची नाकेबंदी कशी करावी, संशयितांचा शोध कसा घ्यावा आणि नागरिकांना सुरक्षित कसे बाहेर काढावे, याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच अग्निशमन दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि इतर संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. या मॉक ड्रिलमुळे दहशतवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमधील समन्वय आणि तातडीने प्रतिसाद देण्याची क्षमता तपासण्यात आली.

















Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories