विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचा १३ ऑगस्टपासून संपाचा इशारा
विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचा १३ ऑगस्टपासून संपाचा इशारा
पिंपरी, ता. ६ ऑगस्ट २०२६ - दिनांक १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अंशदान पेन्शनबाबत निर्णय घ्यावा, प्रलंबित बोनस व सानुग्रह अनुदानाचा करार तातडीने करावा या मुख्य मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने संपाचा इशारा दिला आहे. याबाबतची नोटीस महासंघाने महापालिका आयुक्तांना दिली आहे. मागण्यांबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास १३ ऑगस्टपासून महापालिका कर्मचारी संपावर जातील, असे महासंघाने म्हटले आहे.
महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे आणि सरचिटणीस अभिमान भोसले यांनी संपाची नोटीस दिली आहे. संपापूर्वी चर्चेद्वारे तोडगा काढण्याची तयारी देखील दर्शविली आहे.
कर्मचाऱ्यांना बोनस व सानुग्रह अनुदानाचा करार, अंशदान पेन्शनची रक्कम, पीएमपीएमएलमधून महापालिकेत आलेल्या ११८ कर्मचाऱ्यांचे निवृत्तीविषयक लाभ, जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवा नियमावली व आकृतीबंध मंजूर करणे, तसेच कासारवाडी आयटीआय प्राचार्य आणि समायोजित कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करण्यासह विविध मागण्या केल्या आहेत.
याबाबत बोलताना बबन झिंजुर्डे म्हणाले की, ''२५ मार्च आणि २१ जुलैला प्रलंबित मागण्यांबाबत आयुक्तांकडे चर्चेसाठी वेळ मागितली होती. परंतु, या प्रश्नावर वारंवार पाठपुरावा करूनही चर्चा न झाल्यामुळे महासंघाने महापालिका आयुक्तांना नोटीस दिली आहे. मागण्यांबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास १३ ऑगस्टपासून संप पुकारला जाईल.''
- बबन झिंजुर्डे, Baban Zhinjurde, अभिमान भोसले, Abhiman Bhosale
- कर्मचारी मागण्या, Employees Demandsकर्मचारी मागण्या, Employees Demandsकर्मचारी मागण्या, Employees Demands
- संपाचा इशारा, 13 August Strike, 13 ऑगस्ट संप
- कर्मचारी संप, Employees Strike, Strike Notice
- PCMC, महापालिका कर्मचारी महासंघ, Pimpri Chinchwad Municipal Employees Federation