दिवाळी वस्तू संकलन मोहीम ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर; सोसायट्यांची संपूर्ण यादी

दिवाळी वस्तू संकलन मोहीम ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर; सोसायट्यांची संपूर्ण यादी

पिंपरी | २९ ऑक्टोबर २०२६ : दिवाळीनिमित्त घरांची साफसफाई करताना वापरात नसलेल्या, मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू फेकून न देता गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि स्वच्छ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘आर.आर.आर. (रिड्यूस, रीयूज, रिसायकल) कलेक्शन ड्राइव्ह’ आयोजित करण्यात आला आहे. ही विशेष मोहीम ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेत नागरिकांना कपडे, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, खेळणी, भांडी, चादरी, पडदे, फर्निचर आणि वापरण्यायोग्य इलेक्ट्रॉनिक वस्तू जमा करता येणार आहेत. संकलित वस्तूंचा पुनर्वापर करून त्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविणे, कचऱ्याचे प्रमाण कमी करणे आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वापरण्यायोग्य वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे पर्यावरणावरील ताण कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनीही घरातील सुस्थितीत असलेल्या वस्तू आर.आर.आर. केंद्रांमध्ये जमा करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमामुळे गरजू व्यक्तींना उपयुक्त वस्तू उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

३१ ऑक्टोबर रोजी या ठिकाणी होणार वस्तूंचे संकलन:

रेनबो व्हिस्टा, आहेरनगर; सिद्धिविनायक विंड चाइम, रहाटणी; द वुड्स, वाकड; अक्षर एलिमेंटा व पॅलॅडिओ अपार्टमेंट, ताथवडे; द्वारका सनक्रेस्ट फेज १ व यश संकुल, पिंपळे सौदागर; ओमेगा पॅराडाइज, होरायझन्स ॲट वाकड व ला मेलोसा, वाकड; भूमी ओराबेल, सेलेस्टियल सोसायटी फेज २, राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटी, उदय हिलटॉप रेसिडेन्सी, संत ज्ञानेश्वर उद्यान व चंद्रभागा कॉर्नर, रावेत; तसेच रेणुका पंचतत्त्व, ताथवडे येथे वस्तू संकलन करण्यात येणार आहे.

१ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी होणार वस्तूंचे संकलन:

वुड्सव्हिल फेज १, फेज २ व फेज ३, लोटस नंदवन फेज १, कुमार प्रिन्सव्हिल फेज १ आणि सेंट्रल पार्क रेसिडेन्सी, मोशी; रिव्हर रेसिडेन्सी फेज ३, चिखली; ऐश्वर्यम, आकुर्डी; गोखले वृंदावन, चिंचवड; ट्युलिप इन्फिनिटी वर्ल्ड, पुनावळे; मिलेनियम पॅसिफिक; वसंत ॲव्हेन्यू, ताथवडे; निसर्ग किरण, रहाटणी; गंगा स्काइज सोसायटी; वल्लभनगर, पिंपरी आणि कुमार प्रथम, मोशी येथे वस्तू संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेसंदर्भात अधिक माहिती किंवा मदतीसाठी नागरिकांनी ७०३०९०१९९३ किंवा ९१६८६८४६७० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे महापालिकेने कळविले आहे.

दिवाळीचा आनंद इतरांसोबत वाटून घेत सामाजिक जबाबदारी जपण्यासाठी आणि वापरण्यायोग्य वस्तूंचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांनी या दोन दिवसीय मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories