शास्तीकर माफीनुसार 22 हजार 906 मालमत्ताधारकांच्या रकमेचे मालमत्ताकरामध्ये समायोजन करण्यास स्थायी समितीची मान्यता

शास्तीकर माफीनुसार 22 हजार 906 मालमत्ताधारकांच्या रकमेचे मालमत्ताकरामध्ये समायोजन करण्यास स्थायी समितीची मान्यता

 शास्तीकर माफीनुसार 22 हजार 906 मालमत्ताधारकांच्या रकमेचे मालमत्ताकरामध्ये समायोजन करण्यास स्थायी समितीची मान्यता

पिंपरी, ता. ११  - पिंपरी-चिंचवड शहरातील सन 2023 पूर्वी झालेल्या अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्तीकर (दंड) राज्य सरकारने माफ केला आहे. त्यानुसार,  चालू 2026-27 या वर्षात 22 हजार 906 मालमत्ताधारकांच्या रकमेचेही मालमत्ताकरामध्ये समायोजन करण्यास स्थायी समितीने बुधवारी (दि. 10) मान्यता दिली आहे.

मालमत्ताकराचे समायोजन (प्राप्रर्टी टॅक्स अॅडजेस्टमेंट) म्हणजे तुमच्या मालमत्ताकराच्या बिलामध्ये आधी भरलेली जास्तीची रक्कम किंवा झालेली अतिरिक्त आकारणी समायोजित करण्याची प्रक्रिया. शहरातील अनधिकृत बांधकामांना सन 2012-13 पासून शास्तीकर वसूल केला जात होता. राज्य शासनाने तीन मार्च 2023 ला शहरातील अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 3 मार्च 2023 पूर्वी झालेल्या 25 हजार 673 अनधिकृत बांधकामांना याचा लाभमिळाला. या मालमत्ताधारकांनी शास्तीकराची 260 कोटी 53 लाख रुपयांची रक्कम महापालिकेकडे जमा केली होती. महापालिकेने आत्तापर्यंत  96 कोटी 12 लाख रुपयांचे समायोजन केले आहे.

शास्तीकर माफीचा निर्णय झाल्यानंतर सन 2023-24 मध्ये 22 हजार 512 मालमत्ताधारकांना 30 कोटी 3 लाख रुपये, सन 2024-25 मध्ये 25 हजार 673 मालमत्ताधारकांना 35 कोटी 95 लाख रुपये सन 2025-26 मध्ये 21 हजार 824 मालमत्ताधारकांना 30 कोटी 14 लाख असे एकूण 96 कोटी 12 लाख रुपयांची रक्कम मालमत्ताकरामध्ये समायोजित करण्यात आली. त्यानंतरही 22 हजार 906 मालमत्ताधारकांची 164 कोटी 41 लाख रुपयांची रक्कम मालमत्ताकरामध्ये समायोजित करणे बाकी आहे. त्यानुसार, सन 2026-27 या आर्थिक वर्षात 164 कोटी 41 लाखांपैकी जेवढी शक्य आहे, त्यानुसार ती रक्कम समायोजित केली जाणार आहे. या समायोजनेला स्थायी समितीने आज मान्यता दिली आहे, अशी माहिती महापालिकेचे करसंकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.

22 हजार 906 मालमत्ताधारकांच्या रकमेचे समायोजन होणार....

''शहरातील 25 हजार 673 मालमत्ताधारकांनी प्रामाणिकपणे शास्तीकर भरून मालमत्ताकर महापालिकेकडे जमा केला होता. राज्य सरकारने 2023 मध्ये शास्तीकर माफीचा निर्णय घेतला. त्यामुळे शास्तीकर भरलेल्या नागरिकांची रक्कम सन 2023-24 पासून त्यांच्या मालमत्ताकरातून समायोजित केली जात आहे. आतापर्यंत 260 कोटी 53 लाखांपैकी 96 कोटी 12 लाख रुपये समायोजन केले आहे. चालू आर्थिक वर्षात 22 हजार 906 मालमत्ताधारकांची आगाऊ भरलेली रक्कम मालमत्ताकरात समायोजित केली जाणार आहे.'', असे स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.

वर्षात समायोजन नाही.....

''अनधिकृत बांधकामधारकांच्या बिलामध्ये शास्तीकराचे समायोजन केले जात आहे. ही रक्कम मोठी असल्यामुळे एका वर्षात समायोजन होऊ शकत नाही. दरवर्षी मालमत्ताधारकांच्या बिलानुसार समायोजन केले जात आहे. चालू 2026-27 या आर्थिक वर्षात 22 हजार 906 मालमत्ताधारकांच्या रकमेचे समायोजन केले जाणार आहे. महापालिकेकडे 164 कोटी 41 लाख रुपये समायोजन करणे बाकी आहे.'', असे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories