पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये दुरुस्ती, रंगरंगोटी व स्वच्छतेच्या कामांची लगबग
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये दुरुस्ती, रंगरंगोटी व स्वच्छतेच्या कामांची लगबग
पिंपरी, ता. १० - नवीन शैक्षणिक वर्ष येत्या १५ जूनपासून सुरु होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये वर्गखोल्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी सुरु आहे. आवश्यक कामे पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्यात सर्व शाळांची यंत्रांच्या सहाय्याने संपूर्ण साफसफाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण ११० शाळा आहेत. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना प्रसन्न वातारवरण अनुभवायला मिळावे म्हणून कामांची लगबग सुरु आहे. वर्गखोल्यांमधील खिडक्या, दरवाजे, बाके आणि खुर्थ्यांची दुरुस्ती केली जात असून, फळ्यांना नवीन रंग दिला जात आहे. वर्गखोल्यांमधील भिंतींवर आकर्षक रंगकाम करुन त्या बोलक्या करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची साफसफाई, स्वच्छतागृहांची डागडुजी व निर्जंतुकीकरणाची कामेही सुरु आहेत.
१५ जूनपासून महापालिकेच्या शाळा सुरु
''महापालिकेच्या शाळा १५ जूनला सुरु होत आहेत. त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून शाळांची डागडुजी, रंगरंगोटीचे काम सुरु आहे. लवकरच आरोग्य विभागाच्या मदतीने यंत्रांच्या सहाय्याने वर्गखोल्यांची संपूर्ण साफसफाई केली जाणार आहे.''
संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका
- Classroom Renovation, वर्गखोल्यांची दुरुस्ती, Classroom Maintenance, School Infrastructure, शाळांची स्वच्छता,
- School Reopening, School Preparation, शाळांची दुरुस्ती, School Repair Work, रंगरंगोटी, School Painting,
- पिंपरी-चिंचवड शाळा, Pimpri Chinchwad Schools, नवीन शैक्षणिक वर्ष, New Academic Year
- Pimpri Chinchwad Municipal Corporation, PCMC, PCMC Schools, महापालिका शाळा, Municipal Schools