तळेगाव एमआयडीसीतील कंपनीत कार्बन डायऑक्साइड गॅस गळती, दोन कामगारांचा मृत्यू

तळेगाव एमआयडीसीतील कंपनीत कार्बन डायऑक्साइड गॅस गळती, दोन कामगारांचा मृत्यू

तळेगाव एमआयडीसीतील कंपनीत कार्बन डायऑक्साइड गॅस गळती, दोन कामगारांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

पिंपरी, ता. १० - पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी येथील नवलाख उंबरे परिसरातील शॅफ्लर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साइड (CO_2) गॅस गळती होऊन दोन कामगार जागीच मरण पावले. ही गंभीर घटना मंगळवारी (ता. ९) रात्री घडली आहे. गणेश उंबरे आणि वैभव थोरात अशी मृत कामगारांची नावे आहेत. 

सुरुवातीला या ठिकाणी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, प्रशासकीय तपासणीत ती गॅस गळती असल्याचे स्पष्ट झाले. श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे कामगार या गॅसच्या प्रभावामुळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासन, एमआयडीसीची सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक पोलिस तातडीने घटनास्थळी पोचले. प्रशासनाकडून संपूर्ण परिसराची तातडीने नाकेबंदी करण्यात आली. गॅस गळती रोखण्यासाठी आणि परिसराच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सर्व खबरदारीचे उपाय करण्यात आले. ही गॅस गळती नेमकी तांत्रिक बिघाडामुळे झाली की मानवी चुकीमुळे, याचा तपास पोलिस करत आहेत. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories