पुनर्रचनेनंतर महापालिकेच्या १० क्षेत्रिय कार्यालयांचे दैनंदिन कामकाज १ जुलैपासून सुरु होणार

पुनर्रचनेनंतर महापालिकेच्या १० क्षेत्रिय कार्यालयांचे दैनंदिन कामकाज १ जुलैपासून सुरु होणार

  पुनर्रचनेनंतर महापालिकेच्या १० क्षेत्रिय कार्यालयांचे दैनंदिन कामकाज १ जुलैपासून सुरु होणार  

पिंपरी, ता. १७ - वेगाने विस्तारणाऱ्या शहरात नागरीकांना सुलभ व तत्पर सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालयांची संख्या आता ८ वरुन १० केली आहे. या क्षेत्रीय कार्यालयांचे दैनंदिन कामकाज दिनांक १ जुलै २०२६ पासून नियमितपणे सुरु केले जाणार आहे. याबाबत, आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सध्या अस्तित्वात असलेली ८ प्रभाग कार्यालये अपुरी ठरत होती. त्यामुळे, या क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना करुन १० क्षेत्रिय कार्यालयांची स्थापना करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अन्वये ३२ निवडणूक प्रभागांची विभागणी करण्यात आली आहे आणि १० क्षेत्रिय कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांना गड-किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत.

संबंधित क्षेत्रिय कार्यालयाच्या प्रादेशिक क्षेत्रासाठी नियुक्त अधिकाऱ्यास "क्षेत्रीय अधिकारी" म्हणून घोषित करण्यात येत आहे. क्षेत्रीय कार्यालयांमधील दैनंदिन कामकाज दिनांक १ जुलै २०२६ पासून नियमितपणे सुरु केले जाणार आहे. 


तपशीलवार माहिती - 

१) अ क्षेत्रिय कार्यालय - (राजगड) -  संत ज्ञानेश्वर चौक, निगडी प्राधिकरण निगडी ४११०४४  - प्रभाग क्रमांक १३, १४, १५ साठी आहे.


२) ब क्षेत्रिय कार्यालय - (सिंहगड) - लिंक रोड, एल्प्रो कंपनी आवार, चिंचवडगाव, ४११०३३  - प्रभाग क्रमांक १७, १८, १९ साठी आहे.


३) क क्षेत्रिय कार्यालय - (विजयदुर्ग) - हॉकी स्टेडियम शेजारी, नेहरूनगर, भोसरी ४११०२६  - प्रभाग क्रमांक २, ९, १० साठी आहे.


४) ड क्षेत्रीय कार्यालय - (देवगिरी) - औंध-रावेत रोड, रहाटणी, रहाटणी ४११०१७ - प्रभाग क्रमांक २१, २७, २८, २९ साठी आहे.


५) ई क्षेत्रीय कार्यालय - (शिवनेरी) - पांजरपोळ संस्थे समोर, नाशिक रोड, भोसरी ४११०३९ - प्रभाग क्रमांक ३, ४, ५ साठी आहे.


६) फ क्षेत्रीय कार्यालय - (तोरणा) - नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाची जुनी इमारत लोकमान्य टिळक चौक, निगडी ४११०४४ - प्रभाग क्रमांक १, ११, १२ साठी आहे.


७) ग क्षेत्रीय कार्यालय - (पुरंदर) - नविन प्रशासकिय इमारत, दिलिप वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमी मागे थेरगाव, पुणे-३३ - प्रभाग क्रमांक २२, २३, २४ साठी आहे.


८) ह क्षेत्रीय कार्यालय - (प्रतापगड)  - कासारवाडी येथील महिला आय.टी.आय इमारत, कासारवाडी - प्रभाग क्रमांक ३०, ३१, ३२ साठी आहे.


९) ज क्षेत्रीय कार्यालय - (रायगड) - स.नं २७, मनपा वाहनतळ इमारत, ताथवडे, पुणे ४११ ०३३ - प्रभाग क्रमांक १६, २५, २६ साठी आहे.


१०) ल क्षेत्रीय कार्यालय - (लोहगड) - म्हाडा, प्लॉट नं E-२, संत तुकाराम नगर, पोलिस स्टेशन समोर, पिंपरी पुणे ४११ ०१८ - प्रभाग क्रमांक ६, ७, ८, २० साठी आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories