news
clock
गुणवान खेळाडूंच्या पाठीशी महापालिका नेहमी भक्कमपणे उभी राहील - महापौर रवी लांडगे ............... किंग मार्शल आर्ट्स संस्थेच्या खेळाडूंचा महापौरांच्या  यांच्या हस्ते सन्मान

गुणवान खेळाडूंच्या पाठीशी महापालिका नेहमी भक्कमपणे उभी राहील - महापौर रवी लांडगे ............... किंग मार्शल आर्ट्स संस्थेच्या खेळाडूंचा महापौरांच्या यांच्या हस्ते सन्मान

गुणवान खेळाडूंच्या पाठीशी महापालिका नेहमी भक्कमपणे उभी राहील - महापौर रवी लांडगे

किंग मार्शल आर्ट्स संस्थेच्या खेळाडूंचा महापौरांच्या  यांच्या हस्ते सन्मान 

पिंपरी, ता. १२ - ''पिंपरी चिंचवड हे केवळ औद्योगिक शहर नसून क्रीडा क्षेत्रातही देशाला दिशा देणारे शहर बनत आहे. आपल्या शहरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत आहेत, ही प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी बाब आहे. जयदेव म्हमाणे यांच्यासारख्या खेळाडूंमुळे शहरातील युवा पिढीला नवी ऊर्जा मिळत आहे. अशा खेळाडूंच्या पाठीशी महापालिका कायम भक्कमपणे उभी राहील.'', असा शब्द महापौर रवी लांडगे यांनी दिला.

पिंपरी-चिंचवड शहरातील क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या किंग मार्शल आर्ट्स संस्थेच्या विद्यार्थ्यांचा महापौर कार्यालयात महापौरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव जाधव उपस्थित होते. खेळाडूंना भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनदेखील यावेळी महापौरांनी दिले.

उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे नुकत्याच भारत-नेपाळ यांच्यात पार पडलेल्या इंडियन इंटरग्रील चॅम्पियन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताकडून खेळताना थेरगाव येथील चार खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत शहराचा गौरव वाढविला. यामध्ये जयदेव म्हमाणे यांनी सुवर्णपदक पटकावत विशेष यश संपादन केले. यापूर्वीही त्यांनी तब्बल ११ सुवर्णपदके जिंकून आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीची छाप उमटवली आहे. त्यांच्या उल्लेखनीय यशाची दखल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील घेतली असून, हे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाचे क्षण असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

यावेळी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले, ''खेळाडूंचे यश हे संपूर्ण शहराचा सन्मान आहे. कठोर मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर पिंपरी-चिंचवडचे नाव पोहोचवले आहे. भविष्यात अशा खेळाडूंना अधिक प्रोत्साहन व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.'' 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories