एनडीए सरकारच्या १२ वर्षपूर्तीनिमित्त विकास कामांना भेटी, स्वच्छता अभियान तसेच विशेष जनसंपर्क अभियान
एनडीए सरकारच्या १२ वर्षपूर्तीनिमित्त विकास कामांना भेटी, स्वच्छता अभियान तसेच विशेष जनसंपर्क अभियान
पिंपरी, ता. ११ - “राष्ट्र प्रथम” या संकल्पनेवर अखंड विश्वास ठेवत देशसेवेत कार्यरत असलेले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली एनडीए सरकारची ऐतिहासिक १२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भोसरी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना भेटी, स्वच्छता अभियान तसेच विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात आले, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
एनडीए सरकारचा गरीब, शोषित, वंचित घटकांच्या सक्षमीकरणापासून ते विकसित भारत या ध्येयापर्यंतचा हा प्रवास देशासाठी अभिमानास्पद आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली "मोदी सरकारची १२ वर्षे - विश्वास, विकास, जनकल्याण" अभियान राबवले जात आहे.
या अभियानांतर्गत निगडी बस स्टॉप व भक्ती शक्ती मेट्रो स्टेशन पाहणी करण्यात आली, अमृता विद्यालय ते साईनाथ नगर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, तसेच माता अमृतानंदमयी शाळेसमोर सनराईज टॉवर्स कम्युनिटी हॉल येथे विशेष जनसंपर्क अभियानंतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी आजी माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.