महानगरपालिका आयोजित क्रीडा स्पर्धांमधील खेळाडूंना दुखापत विमा संरक्षण द्यावे, भाजप क्रीडा विभाग शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांची मागणी
महानगरपालिका आयोजित क्रीडा स्पर्धांमधील खेळाडूंना दुखापत विमा संरक्षण द्यावे, भाजप क्रीडा विभाग शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांची मागणी
पिंपरी, ता. १३ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना दुखापतीच्या प्रसंगी आर्थिक व वैद्यकीय संरक्षण मिळावे, यासाठी सर्व खेळाडूंचा दुखापत विमा (Accident Insurance) काढण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे क्रीडा विभागाचे शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांनी क्रीडा समिती सभापती कैलास कुटे यांच्याकडे केली आहे. याबाबत, क्रीडा समिती सभापतींना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिका आयोजित स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होत असतात. खेळादरम्यान होणाऱ्या अपघातांमुळे किंवा दुखापतींमुळे अनेक खेळाडूंना उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना विमा संरक्षण देणे ही काळाची गरज आहे.
तसेच, स्पर्धा स्थळी वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यामुळे खेळाडूंची सुरक्षितता वाढेल आणि क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक युवकांचा सहभाग वाढण्यास मदत होईल.
याबाबत बोलताना अरुण पाडुळे म्हणाले, ''क्रीडा सभापती कैलास कुटे यांनी या मागणीची दखल घेत सकारात्मक विचार करून प्रशासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.''