जिवंत काडतूसासह पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला एमआयडीसी भोसरी परिसरातून अटक
May 05 2026
48
जिवंत काडतूसासह पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला एमआयडीसी भोसरी परिसरातून अटक
पिंपरी, ता. ५ - विनापरवाना ४० हजार रुपयांचे गावठी पिस्तूल व ५०० रुपयांचे जिवंत काडतूस बाळगणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी एमआयडीसी भोसरी परिसरातून सोमवारी (ता. ४) अटक केली.
अटक आरोपीचे नाव सचिन अरुण गायकवाड (वय ३५ वर्षे, रा. बालाजीनगर झोपडपट्टी एम. आय.डी.सी भोसरी) असे आहे. एम.आय.डी.सी भोसरी परिसरात विश्वेश्वर चौकाकडून इंद्रायणीनगरकडे जाणा-या रस्त्याकडेला तो पिस्तूलासह सापडला. त्याने बाळगलेले ४० हजार रुपयांचे गावठी पिस्तूल व ५०० रुपयांचे जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त करुन त्याला अटक केली आहे.
आरोपीविरोधात एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ कलम ३७ (१), (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
-