पीएमपी आगारात महिलेचा राडा; सुरक्षा रक्षकाचा मोबाईल फोडल्याचा आरोप!

पीएमपी आगारात महिलेचा राडा; सुरक्षा रक्षकाचा मोबाईल फोडल्याचा आरोप!

पिंपरी | २६ नोव्हेंबर २०२६ : पीएमपीच्या आगारात वाहनांची नोंद सुरू असताना एका सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. तसेच त्याचा मोबाईल फोडून त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात आल्याची देखील तक्रार आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४५च्या सुमारास नेहरूनगरमधील संत तुकारामनगर आगारात ही घटना घडली. अक्षय अनिल देशपांडे (वय ३९, रा. भोसरी) हे सुरक्षा कक्षात वाहनांच्या ये-जा करण्याच्या नोंदी घेत होते. त्यावेळी पीएपीएमएल डेपोच्या गेटमधून दुचाकीवरून आत येत एका महिलेने त्यांच्या हातातील रजिस्टर ओढून घेत त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून पत्नीला फोन लावण्यास सांगितले.

देशपांडे फोन लावत असताना महिलेने मोबाइल घेऊन खाली आपटून फोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपण क्राइम रिपोर्टर असल्याचे सांगत तिने पैसे मागितले, धमकी दिली आणि मारहाण करून कामात अडथळा आणल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

देशपांडे यांच्या तक्रारीवरून सोनाली विनोद वाघमारे (वय ३८, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्याविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलिसांनी २५ नोव्हेंबरला भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ३०८(२), ३५२, ३५१(२) आणि ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक खोसे तपास पुढील करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories