पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हे उद्योजक व कामगार यांचे पाठीशी - पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हे उद्योजक व कामगार यांचे पाठीशी - पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हे उद्योजक व कामगार यांचे पाठीशी - पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे

विविध अडचणींवर मार्ग काढण्यासाठी उद्योजक व पोलिस दलाची समन्वय बैठक  

पिंपरी, ता. ६ ऑगस्ट २०२६ - उद्योजकांच्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी दक्षिण महाळुंगे, उत्तर महाळुंगे, चाकण दक्षिण व उत्तर चाकण या चारही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रमुख कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक बुधवारी (ता. ५)  मर्सिडीज कंपनीच्या सभागृहात पार पडली. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त डॉ. विनय कुमार चौबे यांनी मार्गदर्शन केले. 

या बैठकीला उद्योजक, पोलिस अधिकारी यांच्यासह एमआयडीसी, एमएसईबी'चे  प्रतिनिधी उपस्थित होते. महाळुंगे एमआयडीसी परिसरातील वाहतूक समस्या

पुणे-नाशिक, चाकण-तळेगाव व चाकण-शिक्रापुर महामार्गावर असणारी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी विशेष ट्राफीक प्लॅनिंग, उद्योजक व पोलिस विभाग यांच्यात समन्वय साधून राज्याची प्रगती साधणे, कंपन्यांतील कामगार प्रश्न, सुरक्षेच्या उपाययोजना, उद्योजक व कामगारांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे,कायदा व सुव्यवस्था याबाबत चर्चा करण्यात आली.

याशिवाय, पोलिस आयुक्तालय हद्दीतील एमआयडीसी विभागातील उद्योग, उद्योजक, कामगार, माथाडी कामगार यांचे गंभीर प्रश्न व गुन्ह्यांच्या निराकरणासाठी गुन्हे शाखेंअंतर्गत 'Industrial Grievances Cell'स्थापन करण्याचे आल्याची माहिती देण्यात आली. या सेलचे हेल्पलाईन नंबर ७५१७७५१७९३/९०२९६३३४५२ जाहीर करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हे उद्योजक व कामगार यांचे पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पोलिस आयुक्त चौबे यांनी दिली. 

सदर बैठकीस सारंग आवाड (अपर पोलिस आयुक्त, गुन्हे), .श्री. मोंडवे (अधिक्षक अभियंता - एमआयडीसी विभाग),  मुकुंद होने (सहायक कामगार आयुक्त, पिंपरी चिंचवड), केशव कालुमाळी (एमएसईबी विभाग), श्वेता खेडकर (पोलिस उपायुक्त, परिमंडळ-४),  मारुती जगताप (पोलिस उपायुक्त, परिमंडळ - ३), विक्रांत देशमुख, (पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा),  प्रिया डमाळे (सहायक पोलिस आयुक्त, महाळुंगे एमआयडीसी विभाग), सुदर्शन राठोड (सहाय्यक पोलिस आयुक्त - गुन्हे-१), गुलाब इमानदार (सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग), विजय ढमाळ (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे), दिगंबर सूर्यवंशी (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे), संजय सोळंके (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चाकण दक्षिण पोलिस ठाणे, जितेंद्र कदम (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चाकण उत्तर पोलिस ठाणे, इतर पोलिस अधिकारी तसेच ५० ते ६० उद्योजक प्रतिनिधी उपस्थित होते.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories