पोलिस भरतीचे आमिष दाखवून युवकाची ३ लाख ७५ हजारांची फसवणूक

पोलिस भरतीचे आमिष दाखवून युवकाची ३ लाख ७५ हजारांची फसवणूक

पोलिस भरतीचे आमिष दाखवून युवकाची ३ लाख ७५ हजारांची फसवणूक, भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी, ता. १३- पोलिस भरती करुन सरकारी  नोकरी लावून देतो असे सांगून तिघांनी एका तरुणाची तब्बल 3 लाख हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक  जुलै २०२४ पासून ते जून २०२६ पर्यंत वाघोली  व मोशी  तसेच मुंबई व छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. आरोपींवर   भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात शुक्रवारी,१२ जूनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मयूर भाऊसाहेब पोळ (वय २४, रा. मोशी, मूळ गाव भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर)याने तक्रार दिली आहे. मयूरने जुलै २०२४ मध्ये रायगड येथे पोलिस भरतीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्याने वाघोली येथील जिद्द अॅकॅडमीमध्ये पोलिस भरतीची तयारी सुरू केली.

यादरम्यान त्याची ओळख आरोपी सूरज रामदास शिवले (रा. वखारीचा मळा, वढू बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याशी झाली. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून पोलिस भरती करुन सरकारी नोकरी  लावून देतो असे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने आरोपी बिपीन दिपक मोहिते (रा. नाशिक, पूर्ण पत्ता माहित नाही) आणि संतोष चंद्रकांत कटारे (रा. मुंबई, पूर्ण पत्ता माहित नाही) यांची ओळख करून दिली.


आरोपी सूरज शिवले याने फिर्यादी मयूरकडून ऑनलाईन स्वरूपात 1,50,000/- रुपये घेतले.  त्यापैकी 25,000 /- परत केले, तर उर्वरित 1,25,000/- परत केले नाहीत. तसेच आरोपी बिपीन मोहिते यानेही मयूरकडून 2,50,000 रुपये घेतले आहेत. या तिन्ही आरोपींनी संगनमत करून मयूरची एकूण 3,75,000 /- रुपयांची  आर्थिक फसवणूक केली आहे.

आरोपी १) सुरज रामदास शिवले (वय अंदाजे ३५ वर्षे रा. वखारीचा मळा वढु बुद्रुक ता. शिरुर), २) बिपीन दिपक मोहिते (वय अंदाजे ४० वर्षे रा. रा. नाशिक पुर्ण पत्ता माहित नाही) आंणि ३) संतोष चंद्रकांत कटारे (वय अंदाजे ३८ वर्षे रा. मुंबई) यांच्याविरोधात एम.आय.डी.सी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम-३१६(२), ३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories