महापालिका रुग्णालयांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांकडून गर्भवतींना मार्गदर्शन

महापालिका रुग्णालयांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांकडून गर्भवतींना मार्गदर्शन

महापालिका रुग्णालयांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांकडून गर्भवतींना मार्गदर्शन

पिंपरी, ता. १२ - प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने महापालिकेच्या यमुनानगर-निगडीतील  व चिंचवडमधील तालेरा रुग्णालयामध्ये विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय विभागाच्या स्त्रीरोग तज्ज्ञांनी गर्भवतींना मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या महापालिका आरोग्य केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

गरोगरपणात घ्यावयाची आवश्यक काळजी, नियमित तपासणीचे महत्त्व, सुरक्षित प्रसूतीसाठी घ्यावयाची खबरदारी आणि अतिजोखमीच्या गर्भधारणेची कारणे या विषयांवर गर्भवतींना सविस्तर माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोचवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले जात आहे. 

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA) ही भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण मोहीम आहे. याचा मुख्य उद्देश गरोदर महिलांना त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (चौथ्या ते नवव्या महिन्यात) मोफत, सर्वसमावेशक आणि दर्जेदार प्रसूतीपूर्व तपासणी सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. हे अभियान  दर महिन्याच्या ९ तारखेला व ९ तारखेला रविवार किंवा सुट्टी असेल तर त्यापुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविण्यात येते. जिल्हास्तरावर सदर अभियान प्रभाविपणे राबविण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व कार्यकारी समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरावर सदर अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी एका नोडल ऑफिसरची नेमणूक करण्यात आलेली आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories