'शहरी (२.०) प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे' स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करा, 'पीएमआरडीए'चे आवाहन
Apr 30 2026
74
'शहरी (२.०) प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे' स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करा, 'पीएमआरडीए'चे आवाहन
पिंपरी, ता. ३० - 'प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0' अंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA)५,२०० हून अधिक घरकुलांचे बांधकाम वेगाने सुरु आहे. पात्र लाभार्थ्यांना स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाकडून रुपये २.५ लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी....
🔸 लाभार्थ्याकडे भारतात कुठेही कायमस्वरुपी पक्के घर नसावे.
🔸 लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावावर भूखंड असणे आवश्यक आहे.
🔸 घराचे बांधकाम निश्चित क्षेत्रफळाच्या मर्यादेत पूर्ण झाले पाहिजे.
🔸 लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न ₹३ लाखांपर्यंत असावे. (उत्पन्नाचा दाखला आवश्यक)
योजनेची वैशिष्ट्ये ....
🔹 स्वतःच्या जागेवर घर बांधण्यासाठी थेट आर्थिक मदत
🔹 केंद्र व राज्य शासनाकडून एकत्रित ₹२.५ लाखांचे अनुदान
▪️ केंद्र शासन: ₹१.५ लाख
▪️ राज्य शासन: ₹१ लाख
🔹 पारदर्शक आणि सुलभ ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
🔹 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विशेष लाभ
अधिक माहितीसाठी पुढील संकेस्थळाला भेट द्यावी...
🌐 वेबसाईट: https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx
- housing units, subsidy, eligible beneficiaries,
- Prime Minister Housing Scheme (Urban) 2.0, Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA),
- संकेस्थळ, पीएमएवाय, PMAYMIS.
- आर्थिक मदत, केंद्र सरकार, राज्य सरकार, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- घरकुल, अनुदान, पात्र लाभार्थी, स्वप्न, हक्काचे घर,
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)
- 'प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०'