पुणे विमानतळावरून रविवारी 108 विमानांचे उड्डाण आणि 108 विमाने उतरली
पिंपरी, ता. ३ ऑगस्ट - पुणे विमानतळावरून तब्बल १०८ विमानांचे उड्डाण झाले आणि १०८ विमाने पुण्यात उतरली. एकाच दिवसात २१६ विमानांच्या वाहतुकीचा नवा विक्रम पुणे विमानतळावर नोंदला गेला.
यापूर्वी १ जून २०२५ रोजी २१२ विमानांची विक्रमी वाहतूक झाली होती. त्यानंतर आता हाच 216 विमानांच्या वाहतुकीचा विक्रम नोंदला गेला आहे.
एकाच दिवसातील प्रवासी संख्या ३३ हजारांच्या पुढे गेली आहे.
पुणे विमानतळाच्या यंदाच्या उन्हाळी हंगामात हवाई दलाने विमानतळ प्रशासनाला १५ अतिरिक्त 'स्लॉट' (विमान उतरण्याची व उड्डाणाची निर्धारित वेळ) उपलब्ध करून दिले.
स्लॉट वाढल्याने पुण्याहून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या संख्येत वाढ झाली आहे.
विमानतळ प्रशासनाने सांगितले की, रविवारी जास्त उड्डाणे होती तरीही
विमानतळावर 'पार्किंग बे'ची कोणतीही समस्या निर्माण झाली नाही. रविवारी सर्व विमान उड्डाणांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन झाले.