आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ५०० कोटी रुपयांचा आगाऊ निधी मिळणार
पिंपरी, ता. ३ ऑगस्ट २०२६ - केंद्र सरकारने अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील मदत, बचाव व पुनर्वसनासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत (एसडीआरएफ) २११७.८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात महाराष्ट्राला ५०० कोटी रुपयांचा आगाऊ निधी मिळणार आहे. मॉन्सूनमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरग्रस्त भागातील मदत आणि बचावकार्यासाठी हा आगाऊ निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
पूरग्रस्त सात राज्यांपैकी हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि नागालँड या राज्यांना २०२६-२७ या वर्षातील 'एसडीआरएफ'चा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. मदतकार्यासाठी निधी वेळेत उपलब्ध व्हावा यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी हिमाचल प्रदेश आणि ओडिशाला केंद्राच्या वाट्यातील 'एसडीआरएफ'चा दुसरा हप्ता आगाऊ स्वरूपात देण्यास मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी....
"अतिवृष्टी व पूरग्रस्त भागासाठी ५०० कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर करून केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दिसून येते. यातून आपत्तीग्रस्त कुटुंबांपर्यंत मदत अधिक वेगाने पोहोचविणे सोपे होणार आहे. या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विशेष आभार."
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, Chief Minister Devendra Fadnavis, नरेंद्र मोदी, Narendra Modi, अमित शहा, Amit Shah, ५०० कोटी निधी, 500 Crore Fund,
- पूरग्रस्त भाग, Flood Affected Areas, मदत आणि बचावकार्य, Relief and Rescue Operations, पुनर्वसन, Rehabilitation, केंद्र सरकार, Central Government
- एसडीआरएफ, SDRF, State Disaster Response Fund, महाराष्ट्र पूरस्थिती, Maharashtra Flood Situation, अतिवृष्टी, Heavy Rainfall
- आपत्ती व्यवस्थापन, Disaster Management, महाराष्ट्र आपत्ती निधी, Maharashtra Disaster Relief Fund