संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी तीन बैलजोड्यांची होणार खरेदी
पिंपरी, ता. ९ - जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याची तयारी श्री संत तुकाराम महाराज संस्थानने सुरु केली आहे. या वर्षी पालखी रथासाठी खिल्लार जातीच्या तीन बैलजोड्या खरेदी केल्या जाणार आहेत, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे, हभप उमेश महाराज मोरे, हभप लक्ष्मण महाराज मोरे यांनी दिली.
देहू ते श्री क्षेत्र पंढरपूर आणि पुनश्च पंढरपूर ते देहू असे ३१ दिवस या बैलजोड्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे, पालखी रथासाठी ताकदवान व उंच बैलजोड्यांची निवड केली जात आहे. गेल्या वर्षी संस्थानने कर्नाटकातून एक आणि सातारा जिल्ह्यातील बावधन येथून एक, अशा दोन खिल्लार बैलजोड्या आणण्यात आल्या होत्या. यंदाही कर्नाटकातील आप्पाचीवाडी तसेच साताऱ्यातील बावधन परिसरात पारंपरिक खिल्लार जातीच्या बैलजोड्यांची पाहणी सुरु आहे.
बैलांची ताकद, चाल, उंची, शिस्त आणि सहनशक्ती या बाबींचे निरीक्षण आणि परीक्षण पूर्ण करून येत्या आठवड्याभरात बैलजोड्या खरेदी केली जाणार आहे. पालखी रथासाठी दोन, चौघडा गाडीसाठी एक, अशा एकूण तीन बैलजोड्या पालखी सेवेत दाखल होणार आहेत.
- विक्रमसिंह महाराज मोरे, Vikramsingh Maharaj More
- पालखी रथ, Palkhi Rath, खिल्लार बैलजोडी, Khillar Bullocks, बैलजोडी खरेदी, Bullock Pair Purchase
- श्री संत तुकाराम महाराज संस्थान, Sant Tukaram Maharaj Sansthan
- आषाढी वारी, Ashadhi Wari, देहू, Dehu, पंढरपूर, Pandharpur
- संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala