मेट्रो प्रवासी व कर्मचाऱ्यांमुळे हरवलेले मंगळसूत्र महिलेला परत मिळाले

मेट्रो प्रवासी व कर्मचाऱ्यांमुळे हरवलेले मंगळसूत्र महिलेला परत मिळाले

मेट्रो प्रवासी व मेट्रो कर्मचाऱ्यांमुळे हरवलेले मंगळसूत्र महिलेला परत मिळाले 

पिंपरी, ता. १२ - कल्याणी नगर मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वार क्र. ४ परिसरात मेट्रो प्रवासी श्रीमती विजया यांना सोन्याचे मंगळसूत्र आढळून आले. त्यांनी कोणताही विलंब न करता प्रामाणिकपणे ते मेट्रो स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केले.

यानंतर स्टेशन कंट्रोलर यांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून संबंधित प्रवाशाचा शोध घेतला. तपासाअंती हे मंगळसूत्र केशवनगर, मुंढवा येथील श्रीमती योगिता साळुंखे यांचे असल्याचे निष्पन्न झाले. आवश्यक माहितीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे हरवलेले मंगळसूत्र सुरक्षितपणे त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

या घटनेतून मेट्रो प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा, सतर्कता, तत्परता तसेच सेवाभावी वृत्ती अधोरेखित झाली आहे. पुणे मेट्रोकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेला, विश्वासाला आणि सेवेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच अशा घटना समाजासमोर प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि नागरिक कर्तव्यभावनेचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून उभ्या राहतात, असे मेट्रो प्रशासाने म्हटले आहे. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories