news
clock
भांडणाच्या रागातून रिक्षाचालक युवकाच्या खुनाचा प्रयत्न, निगडीतील घटना

भांडणाच्या रागातून रिक्षाचालक युवकाच्या खुनाचा प्रयत्न, निगडीतील घटना

भांडणाच्या रागातून रिक्षाचालक युवकाच्या खुनाचा प्रयत्न, निगडीतील घटना 

पिंपरी, ता. २९ - काही वेळापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून २० वर्षीय रिक्षाचालकाच्या  खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार निगडी परिसरात सोमवारी (ता. 27) रात्री पावणे नऊच्या सुमारास घडला. या प्रकरणी चार आरोपी युवकांना पोलिसांनी अटक केली आहे.

टोळक्याच्या हल्ल्यातून बचावलेला रिक्षाचालक अथर्व गणेश शिंदे (वय 20 वर्षे, राहणार ओटा स्कीम निगडी) त्याने तक्रार दिली आहे. आरोपी गणेश लोणकर (वय 25 वर्षे, राहणार निगडी), आकाश खिरडे वय २५ वर्षे, राहणार  चिखली), विकास खिरडे (वय 22 वर्षे, राहणार चिखली) व निहाल (वय 21 वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

सोमवारी फिर्यादी अथर्व त्याचे एका आरोपी सोबत भांडण झाले होते. काही वेळापूर्वी झालेल्या त्या भांडणाचा राग मनात धरून चार जणांच्या टोळक्याने अथर्वचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्याला मागून पकडून, त्याचे हातपाय पकडून धारदार वस्तूने त्याच्या चेहऱ्यावर, हातावर, गळ्यावर वार केले. याच वस्तूचा धाक आरोपींनी जमलेल्या लोकांना मध्ये पडला तर तुम्हालाही मारीन अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली. आरोपींवर मंगळवारी (ता. 28) निगडी पोलीस ठाण्यात भारतीय संहिता कलम 109, 3(5) व महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories