news
clock
जगताप डेअरी ते वाकड परिसरात अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे भुईसपाट

जगताप डेअरी ते वाकड परिसरात अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे भुईसपाट

जगताप डेअरी ते वाकड परिसरात अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे भुईसपाट 

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाची धडक कारवाई

पिंपरी, ता. 29 - महानगरपालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत जगताप डेअरी ते वाकड परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून व्यापक कारवाई मोहीम राबविण्यात आली.  या कारवाई दरम्यान परिसरातील ६ हजार ९४५ चौ. मी. अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकाम असलेल्या ३३ पत्रा शेडवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. या अनुषंगाने वाकड परिसरातील एकूण १०४ मालमत्तांची यादी तयार करण्यात आली होती. न्यायालयीन स्थगिती (स्टे) तसेच अटींसह स्थगिती (कंडिशनल स्टे) असलेल्या मालमत्ता वगळता उर्वरित सर्व अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. 

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तर ड क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडली. यावेळी कारवाई वेळी मुख्यालय अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घारगे, राजाराम सरगर, अजिंक्य येळे, किशोर ननवरे आणि पूजा दूधनाळे यांच्या अधिपत्याखाली झालेल्या या कारवाईत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, विजयकुमार सोनवणे, ड क्षेत्रीय कार्यालयाचे स्थापत्य अभियंता सुनील शिंदे तसेच उप अभियंता संजय चव्हाण, संजय बंडगर, श्याम गर्गे, विनायक माने, संदीप वैद्य हे सहभागी झाले होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories