news
clock
तळवडेमध्ये अल्फा लाव्हल जैवविविधता उद्यानात आढळला आगळावेगळा ....'जंपिंग स्पायडर'

तळवडेमध्ये अल्फा लाव्हल जैवविविधता उद्यानात आढळला आगळावेगळा ....'जंपिंग स्पायडर'

तळवडेमध्ये अल्फा लाव्हल जैवविविधता उद्यानात आढळला आगळावेगळा ....'जंपिंग स्पायडर' 

पिंपरी, ता. ४ - तळवडे येथे 'ओयकॉस फॉर इकॉलॉजिकल सर्व्हिसेस' आणि 'व्हेक्टर' संस्थांच्या पुढाकाराने 'अल्फा लाव्हल जैवविविधता उद्यान' विकसित केले आहे. या उद्यानात जैवविविधतेचे सर्वेक्षण सुरु असताना ३१ मे २०२४ रोजी कोळी अभ्यासक अथर्व कुलकर्णी यांना बाभूळ आणि आपट्याच्या झाडावर 'जंपिंग स्पायडर' हा आगळावेगळा कोळी पहिल्यांदा आढळला आहे. 

कुलकर्णी यांनी  ऋषीकेश त्रिपाठी व गौतम कदम या संशोधकांच्या मदतीने  या कोळी किड्याचे सूक्ष्मदर्शकाखाली सखोल शास्त्रीय परीक्षण केले. तब्बल दोन वर्षांच्या अभ्यासानंतर नव्या कोळ्याच्या शोधाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.   शहराच्या सन्मानार्थ या कोळ्याच्या प्रजातीला 'मोग्रस पुणे' असे नाव दिले आहे. 

ऋषीकेश त्रिपाठी, गौतम कदम, अथर्व कुलकर्णी, ध्रुव प्रजापती, थ्रेसा जॉय आशा, आशिष कुमार जांगिड आणि अंबालापरंबिल वासू सुधिकुमार या संशोधकांच्या पथकाने पश्चिम भारताच्या निमशुष्क (सवाना) परिसंस्थेत अभ्यास करून 'मोग्रस' वंशातील एकूण चार नवीन प्रजातींची नोंद केली आहे. यात पिंपरी-चिंचवडमधील 'मोग्रस पुणे'सह राजस्थानच्या डेझर्ट नॅशनल पार्कमधील 'मोग्रस शुष्क', 'मोग्रस राजस्थानेन्सिस' आणि 'मोग्रस लॅरिसे' यांचा समावेश आहे. या संशोधकांच्या पथकाचा हा शोधनिबंध 'युरोपियन जर्नल ऑफ टॅक्सोनॉमी'मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

जाळे न विणता तीक्ष्ण नजरेने उडी मारुन कीटकांची शिकार करणे, हानिकारक कीटकांचा नाश करत असल्याने शेतीसाठी नैसर्गिक कीटकनाशक म्हणून उपयुक्त, कोरड्या वातावरणात आणि काटेरी झाडांवर मुख्य अधिवास.. ही मोग्रस कोळ्याची वैशिष्ट्ये आहेत, असे संशोधकांनी सांगितले. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories