चिंचवड येथील सोनिगरा ज्वेलर्स तर्फे गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

चिंचवड येथील सोनिगरा ज्वेलर्स तर्फे गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

चिंचवड येथील सोनिगरा ज्वेलर्स तर्फे गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन 

पिंपरी, ता. ५ ऑगस्ट २०२६ - स्वर्गीय श्री पनराजजी पुखराजजी सोनिगरा यांच्या १७ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त, पनराज पुखराज सोनिगरा फाऊंडेशन आणि मोरया मल्टीस्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. ६) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर चिंचवड येथील सोनिगरा - द मार्क साइट, चिंचवड येथे होणार आहे.

माणूस जगतो तो आपल्या कर्माने आणि समाजासाठी केलेल्या सेवेमुळे. रक्तदान हे असेच एक कार्य आहे जे कोणाच्यातरी आयुष्याला नवसंजीवनी देऊ शकते.

आपल्या रक्ताचा एक छोटासा थेंब एखाद्या अपघातग्रस्ताला, गंभीर रुग्णाला किंवा गरजू व्यक्तीला नवजीवन देऊ शकतो, याच उदात्त हेतूने सोनिगरा ज्वेलर्सचे दिलीप सोनिगरा, अरविंद सोनिगरा व परिवाराच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

''आपण केवळ रक्तदान करत नाही, तर मानवतेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहोत.'', अशी भावना अरविंद सोनिगरा यांनी व्यक्त केली आहे. स्वर्गीय पनराजजी सोनिगरा यांनी आयुष्यभर जपलेल्या समाजसेवेच्या विचारांना हीच खरी आदरांजली ठरेल. रक्ताची गरज कधी, कुणाला आणि किती भासेल हे सांगता येत नाही. त्यामुळे नियमित रक्तदान ही काळाची गरज आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभागी होत सामाजिक बांधिलकी‌ जपत  कुटुंबांमध्ये आशेचा किरण निर्माण करावा असे आवाहन सोनिगरा परिवारातर्फे करण्यात आले आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories