news
clock
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे १ ते ३ मेपर्यंत निगडी-प्राधिकरणात छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला

पिंपरी, ता. ३० - निगडी-प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने १ ते ३ मे पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. मंडळाच्या प्रांगणात सायंकाळी ७ वाजता व्याख्यानास सुरुवात होईल. 

उद्या (ता. १) महाराष्ट्र दिनी माजी खासदार प्रदीप रावत यांचे पहिले व्याख्यान होईल. भारतीय राज्यघटनेतील धर्म स्वातंत्र्य आणि इस्लाम हा विषय ते मांडणार आहेत. शनिवारी (ता. २) अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई या विषयावर इतिहास अभ्यासक जगन्नाथराव लडकत यांचे व्याख्यान होणार आहे. रविवारी (ता. ३) प्रा. डॉ. प्रसन्न देशपांडे यांच्या सांस्कृतिक क्रांती की भ्रांती या विषयावरील व्याख्यानाने व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. 

प्रतीवर्षी या व्याख्यानमालेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. यंदाही नागरीकांनी विविध विषयांवरील मान्यवरांचे विचार जाणून घेत ज्ञानार्जन करण्यासाठी या व्याख्यानमालेला उपस्थित राहावे. व्याख्यान सुरु होण्याआधी १५ मिनीटे उपस्थित राहावे, असे मंडळाने सांगितले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories