सराफी दुकानात चोरी करुन फरार झालेल्या परराज्यातील आरोपींना अटक, गुन्हे शाखा, युनिट - ३ ची कामगिरी

सराफी दुकानात चोरी करुन फरार झालेल्या परराज्यातील आरोपींना अटक, गुन्हे शाखा, युनिट - ३ ची कामगिरी

सराफी दुकानात चोरी करुन फरार झालेल्या परराज्यातील आरोपींना अटक, गुन्हे शाखा, युनिट - ३ ची कामगिरी 

पिंपरी, ता. २ - चाकण बाजारपेठेत सराफी दुकानाची तोडफोड, तेथील दागिन्यांची चोरी करुन फरार झालेल्या परराज्यातील आरोपींना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा, युनिट - ३ च्या तपास पथकाने कसोशीने तांत्रिक तपास करुन अटक केली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी ५५० किमी पर्यंत सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आरोपींकडून  गुन्हयात वापरलेली कार व सोन्याचांदीचे दागिने असा रुपये ३० लाख २० हजार किंमतीचा मुद्येमाल जप्त केला आहे. 

चाकण उत्तर पोलीस स्टेशनमध्ये  दि.२२/०४/२०२६ रोजी रात्री ९.३० वा ते दि.२३/०४/२०२६ रोजी सकाळी ०७.३० दरम्यान श्री खिमत ज्वेलर्समध्ये अज्ञात चोरटयाने पाठीमागील शटरचे कुलुप व आतील दुकानातील लोखंडी ग्रिलचे कुलुप गॅस कटरने तोडुन दुकानातील ७७,२२,०००/- रु किंमतीचे एक ग्रॅम सोन्याचे, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार दिली होती.

या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट तीनच्या तपास पथकाकडे  सोपवण्यात आला होता.

  गुन्हे शाखा युनिट-३ चे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे आणि पोलिस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, संदिप सोनवणे, श्रीधन इचके, सचिन गोनटे, बाळासाहेब भांगले, शशिकांत नांगरे, सुंदर थोरात, समिर काळे, निखील फापाळे, राजकुमार इघारे यांच्या पथकाने तपास मोहीम हाती घेतली. 

 तपास करताना घटनास्थळाच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज‌ तपासले  असता एक संशयित कार नाशिक बाजुकडे जातांना दिसली. तिचा अदांजे ५५० किमी गुजरात राज्यापर्यंत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन व तांत्रिक विश्लेषण केले.‌ तेव्हा आरोपी हे राजस्थान व गुजरात येथील असल्याची माहीती मिळाली. 

तपास  पथकाने सापळा लावला आणि गुजरातमधून आरोपी  १) हिम्मतकुमार रोशनजी साळवी (वय ३७ वर्षे रा.  अहमदाबाद गुजरात २) मुकेश ऊर्फ अजय भैरुलाल सालवी (वय २४ वर्षे रा. जि. भिलवाडा राजस्थान ३) राधेशाम भैरुलाल सालवी (वय २२ वर्षे, रा. जि. भिलवाडा राजस्थान) ४) पुखराज ओमप्रकाश लौहार (वय २१ वर्षे, रा.  जि. राजसमंद राजस्थान) यांना ताब्यात घेतले.  त्यांच्याकडे सदर गुन्हयाबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी व त्यांचे आणखी दोन साथीदार  ५) सुमित राजुभाई बंगाली व ६) कालु असे मिळून सराफी दुकानात चोरी केल्याची कबुली दिली.

सर्व आरोपी कारने चाकण येथे आले व श्री खिमत ज्वेलर्स या सराफा दुकानामधील मुद्येमाल चोरुन घेऊन गेले होते. आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी सांगीतले की, आम्ही सदर दुकानामध्ये काम करणारा  किशन रामलाल सोनी (वय २२ वर्ष सध्या रा. आंबेठाण चौक, चाकण पुणे, मूळ राजस्थान) याच्या सांगणावरुन चाकण येथे येऊन त्याने दिलेल्या चावीच्या सहाय्याने शटर उघडुन गॅस कटरने ग्रील व दरवाजा कट करुन दुकानातील सोन्या चांदीचे वेगवेगळे दागिने व रोख रक्कम चोरी केली.  त्यातील काही मुद्येमाल राजु रा. राजस्थान (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यास दिल्याचे व काही मुद्येमाल सुमित बंगाली व कालु रा. सुरत (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांना दिल्याचे कबुली दिली. 

 आरोपींकडून गुन्हा करतेवळी वापरलेली  ३,००,०००/- रु किंमतीची मारुती स्वीफ्ट कारव बेन्टेक्स पिवळया धातुचे दागिने ज्यात कर्णफुले, बांगड्या, हातकडे, ब्रासलेट, गळयातील पेंडाल, गंठण व बिंदीया असे एकुण २.९०० कि.ग्रॅ. २०,०००/-किंमतीचे तसेच चांदीचे दागिने ज्यामध्ये पत्रीदेव, मुर्ती, चांदीच्या पाटया, गणपती, लक्ष्मी, अन्नपुर्णा मुर्ती, पैजंन जोडी, अंगठी, वाळे, ग्लास, चांदीचा चुरा असे एकुण १७.८०० कि.ग्रॅ. २७,००,०००/- रु किंमतीचे दागिने असा एकुण ३०,२०,०००/- किंमतीचा मुद्येमाल  जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त  विनय कुमार चौबे, पोलिस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त  सारंग आवाड, पोलिस उप-आयुक्त गुन्हे, डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे, डॉ. विशाल हिरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व सुचनाप्रमाणे संतोष कसबे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ३) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भरत गोसावी व सुनिल जावळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, संदिप सोनवणे, श्रीधन इचके, मनोज साबळे, सचिन गोनटे, बाळासाहेब भांगले, सुधिर दांगट, स्वप्नील महाले, शशिकांत नांगरे, सुंदर थोरात, समिर काळे, निखील फापाळे, राजकुमार इघारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories