उद्धव ठाकरेंचे सहा खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर

उद्धव ठाकरेंचे सहा खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर

 उद्धव ठाकरेंचे सहा खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर 

पुणे, ता. १७ - गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सात खासदार पक्षांतर करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि आता तसेच झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या खासदारांनी गट स्थापन करण्याची प्रक्रिया दिल्लीमध्ये पूर्ण केली आहे.  ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले होते. त्यानंतर देखील गटाची स्थापना झाली आणि आता हा गट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करेल. शिवसेनेच्या वर्धापन दिनी म्हणजे १९ जूनला त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश पार पडले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पक्षांतरबंदी कायद्यानुसार, स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आमदार किंवा खासदार संख्येच्या एकूण संख्याबळाच्या दोन तृतीयांश संख्याबळाची गरज असते. ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार आहेत. यापैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामुळे या गटाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनी म्हणजे १९ जूनला खासदार आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती आहे.  

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटकपक्षांची दिल्लीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला एकनाथ शिंदे हजर होते. या बैठकीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात ऑपरेशन टायगर संदर्भात चर्चा झाली. अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून या ऑपरेशनसाठी संमती मिळवली. मोदींनी संमती दिल्यानंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही वेळानंतर एक बैठक घेतली. या बैठकीत अमित शाह यांनी संमती दिली आणि पुढील हालचाली सुरू झाल्या, अशी माहिती आहे.

उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार असे -

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे


एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणारे खासदार असे - 

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories