पिंपरीगावातून मध्यरात्री रस्त्यावर बसलेल्या गायीची चोरी
पिंपरी, ता. २९ जुलै २०२६ - पिंपरीगावातील वैभवनगर परिसरात मध्यरात्री रस्त्यावर बसलेल्या गायींपैकी एका गायीला अज्ञात चोरट्यांनी कारमधून पळवून नेले आहे.
मंगळवारी (ता. २८) पहाटे घडलेला हा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. याबाबत अभिजित ज्ञानेश्वर शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पळवून नेलेल्या गायीची किंमत सुमारे २० हजार रुपये आहे. मंगळवारी (ता. ८) मध्यरात्री तीन चोरटे कारमधून तिथे आले. चार-पाच गायी रस्त्यावर बसलेल्या होत्या. त्यापैकी एका मोठ्या गायीला चोरट्यांनी ओढून-ढकलून कारमध्ये घातल्याचे सीसीटिव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. पोलिस आता पुढील तपास करत आहेत
या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.
- मध्यरात्री चोरी, Cow Stolen, गाय पळवली, Car Used in Theft, कारमधून चोरी, Police Investigation, पोलिस तपास, FIR Registered
- CCTV Footage, सीसीटीव्ही फुटेज, Unknown Thieves, अज्ञात चोरटे, Midnight Theft
- पिंपरीगाव, Pimpri Gaon, वैभवनगर, Vaibhavnagar, गाय चोरी, Cow Theft, Cattle Theft, जनावर चोरी, Livestock Theft,