'बालमजुरी थांबवू,भविष्य घडवू'........कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे जनजागृती

'बालमजुरी थांबवू,भविष्य घडवू'........कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे जनजागृती

'बालमजुरी थांबवू,भविष्य घडवू'........कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे जनजागृती 

पिंपरी, ता. १३ - जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ (महाराष्ट्र), कष्टकरी रिक्षा टॅक्सी चालक संघर्ष महासंघ आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे 'बालमजुरी नको, शिक्षण देऊ', 'बालमजुरी थांबवू,भविष्य घडवू' याबाबत जनजागृती करण्यात आली.   

यामध्ये, कष्टकरी कामागारांनी हाती फलक घेऊन बालमजुरी थांबवण्यासाठी जागृती केली. कष्टकरी कामागरांच्या सहभागामुळे जागृती उपक्रम अधिक प्रभावीपणे इतर कष्टकरी कामगारांच्या आणि नागरीकांच्या मनावर बिंबवला गेला. कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रमुख काशिनाथ नखाते यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

 एखादे मूल शाळेत जाण्याऐवजी आर्थिक परिस्थितीमुळे काम करण्यास भाग पडते, तेव्हा केवळ त्याचे बालपण हिरावले जात नाही तर त्याच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होऊन सामाजिक अन्यायालाही खतपाणी घातले जाते. बालमजुरी ही केवळ एखाद्या कुटुंबाची समस्या नसून सामाजिक असमानतेचे विदारक वास्तव आहे. त्यामुळे प्रत्येक बालकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.

 जगभरात १६ कोटींहून अधिक मुले बालमजुरी करत असून भारतातही बालकामगारांची संख्या चिंताजनक आहे. बालकामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा अस्तित्वात असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. प्रत्येक मुलाच्या हातात कामाची साधने नव्हे, तर शिक्षणाची पुस्तके असली पाहिजेत; कारण शिक्षण हाच उज्ज्वल भविष्याचा पाया आहे, असे नखाते यांनी सांगितले. 







Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories