आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी वायसीएम रुग्णालयाला भेट
पिंपरी, ता. २ - नागरिकांना अधिक सक्षम, तत्पर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे, असे महापालिका डॉ. विजय सू्र्यवंशी यांनी सांगितले.
डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकतीच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच) आणि पदव्युत्तर संस्थेला भेट देत विविध विभागांची पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी ICU, NICU, मेडिसिन, शस्त्रक्रिया, बालरोग, अस्थिरोग, ENT, डायलिसिस, X-Ray, USG या विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. उपस्थित रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
विविध विभागांमधील कमतरेच्या बाबी, मुलभूतत सोयीसुविधा, कामगार-डॉक्टर्स-रुग्ण यांच्या अडचणी तसेच मागण्या याबाबत सविस्तरपणे जाणून घेतले आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.