विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला चाकण परिसरातून अटक
पिंपरी, ता. ५ - विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काडतूसासह बाळगणाऱ्या तरुणाला उत्तर चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण अशोक प्रधान (वय २२ वर्षे, ता. खेड) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीने विनापरवाना ५०,०००/- रुपये किंमतीचे १ देशी बनावटीचे पिस्तुल व १०००/- रुपयांच्या काडतूसासह बाळगले होते. पिस्तूल व काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपीला अटक केली आहे. मौजे चाकण गावच्या हद्दीत पठारवाडी जाणाऱ्या रस्त्याकडेला तो पिस्तूलासह सापडला.
आरोपीवर उत्तर चाकण पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.