शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पिंपरी, ता. ६ ऑगस्ट २०२६ - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया शुक्रवार, ७ ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू होणार आहे.

जिल्ह्यात एकूण २६ मागासवर्गीय मुला- मुलींची शासकीय वसतिगृहे कार्यरत असून त्यामध्ये १५ मुलांची व ११ मुलींची वसतीगृहे आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये एकूण १४ शासकीय वसतिगृहे असून त्यापैकी ९ मुलांची व ५ मुलींची  वसतिगृहे आहेत. तसेच १२ शासकीय वसतिगृहे तालुकास्तरावर आहेत.

वसतिगृह प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार असून प्रवेशासाठी http://hmasnew.mahait.org या पोर्टलवर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज १५ सप्टेंबर पर्यंत स्वीकारण्यात येणार असून २२ सप्टेंबर रोजी यादी प्रसिद्ध करण्यात येईल. इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories