बावधन | ३० ऑक्टोबर २०२६ : पुण्यातील बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागेच्या वादातून एका महिलेसह तिच्या मुलांना आणि दिराला मारहाण करून घरातील साहित्याची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी कंपनी गेट, बाथरूम, सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईट फोडून नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांपासून रात्री ७ वाजून २० मिनिटांदरम्यान पाषाण येथील सर्व्हे क्रमांक २८/४, सुस, पुणे येथे घडली.
या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी बिपीन राय, नवीन राय आणि रितीक चक्रवर्ती (सर्व रा. बाणेर, पुणे) तसेच त्यांच्यासोबत असलेल्या तीन ते चार अनोळखी महिला आणि पुरुषांनी फिर्यादीच्या कंपनीवळ येऊन वाद घातला.
फिर्यादीच्या दिराचे आरोपी क्रमांक एक याच्यासोबत जागेवरून पूर्वीपासून वाद सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याच वादातून आरोपींनी फिर्यादीच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा मोठा मुलगा अमन विनीत राय, लहान मुलगा देव विनीत राय आणि छोटा भाऊ रामव्रत राय यांना शिवीगाळ केली.
त्यानंतर आरोपींनी त्यांना हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यावेळी फिर्यादी महिलेलाही रॉडने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मारहाणीनंतर आरोपींनी साहित्याची तोडफोड केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामध्ये कंपनीचे दोन गेट, बाथरूम, सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईट यांचा समावेश आहे.
आरोपींनी संबंधित साहित्य फोडून नुकसान केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच फिर्यादी महिला, तिची मुले आणि दिराला मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(४), १८९(१), १८९(२) आणि १९० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बावधन पोलीस करीत आहेत.